पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रक्तदानासाठी त्या तरुणानं रमजानचा उपवास मोडला

अहमद

रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान मानलं जातं. भारतात अनेक रुग्णांचा मृत्यू हा रक्त न मिळाल्यानंही होतो. या  संपूर्ण परिस्थितीची जाण ही २५ वर्षीय पनाउल्ला अहमदला आहे. म्हणूनच रक्तदानासाठी त्यानं  रमजानचा उपवास मोडला आणि गरजू  रुग्णाला  रक्तदान केलं.

अहमद हा एका रक्तदाता गटाचा सदस्य आहे. सेहरीनंतर (रमजान रोजाच्या दरम्यान पहाटे पूर्वी खाण्यासाठी परवानगी असते.) अहमदनं आपला  मित्र तपस भगवती याला तणावात पाहिलं. नोकरीनिमित्त हे दोघंही मित्र एकाच खोलीत राहतात. तपसदेखील रक्तदाता गटाचा सदस्य आहे. त्याला रक्तासाठी रात्री उशीरा फोन  आला होता. रुग्णाच्या कुटुंबीयांनी रक्तदाता शोधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना हव्या  असलेल्या गटाचा दाता मिळाला नाही. अहमदचे  उपवास सुरू होते त्यामुळे तो रक्तदान करु शकतो की नाही याची शंका तपसला होती. मात्र अहमदनं क्षणाचाही विलंब न करता रक्तदान करण्याचं ठरवलं. 

'मी  अनेक  ठिकाणाहून रक्त  मिळवण्याचा  प्रयत्न केला मात्र मला नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. तो मदतीला आला ही चांगली  गोष्ट आहे मात्र त्याला उपवास मोडावा लागला'  असं तपस हिंदूस्थान टाइम्सशी साधलेल्या संवादात म्हणाला. 'मी अनेक मौलवींचा सल्ला घेतला. त्यांनी रक्तदान झाल्यानंतर अशक्तपणा येऊ नये म्हणून एकदिवसासाठी उपवास मोडून खाण्याचा सल्ला मला दिला', असं अहमद म्हणाला. अहमद देवदूतासारखा  वेळेला मदतीला धावून आला म्हणून रुग्णांच्या नातेवाईकांनी देखील अहमदचे आभार मानले आहेत.