पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएमसी बँक : अभिनेत्रीकडे घर खर्चालाही पैसे नाही, दागिने विकण्याची वेळ

टीव्ही अभिनेत्री नुपुर अलंकार

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेतील  घोटाळ्याचे परिणाम या बँकेतील खातेदारांना अधिक भोगावे लागत आहेत. अनेकांचे  पैस खात्यात अडकले आहेत. पैसे काढण्यावर मर्यादा असल्यानं अनेकजण हतबल आहेत. 

सरकारचा पीएमसी बँक घोटाळ्याशी काहीही संबंध नाही: निर्मला सितारमण

टीव्ही अभिनेत्री नुपुर अलंकार हिला देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 'या बँकेमुळे माझ्याकडे घरखर्चालाही पैसे नाहीत, माझे दागिने विकण्याची वेळ आली आहे', अशी नाराजी  नुपुर यांनी एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेत व्यक्त केली आहे. माझ्या आईला ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे, सासऱ्यांवर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. मला लोकांकडून  पैसे उधार घ्यावे लागत आहेत. जर हिच परिस्थिती कायम राहिली तर मला घरातल्या वस्तू देखील विकाव्या लागतील अशी चिंता नुपूर यांनी व्यक्त केली आहे. 

फडणवीसांनी राज्यावर चार लाख कोटींचे कर्ज करून ठेवले - शरद पवार

फडणवीसांनी राज्यावर चार लाख कोटींचे कर्ज करून ठेवले - शरद पवार

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेत  ४३५५ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. पीएमसीने नियमांकडे दुर्लक्ष करत आपल्या कर्जातील मोठा हिस्सा जमीन आणि इमारत बांधण्यासाठी एचडीआयएल समूहाच्या कंपनीला दिला होता.