पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नमस्ते करण्याच्या पद्धतीवरून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताचे कौतुक!

डोनाल्ड ट्रम्प हात जोडून नमस्ते करताना

कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन करण्यापेक्षा हात जोडून नमस्ते करण्याच्या भारतीय परंपरेबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे कौतुक केले. अशा पद्धतीवरून कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करण्याबाबत भारत जगात इतर देशांपेक्षा पुढे असल्याचे त्यांनी अनौपचारिकपणे म्हटले.

पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी माजी संचालकासह तिघांना अटक

आर्यलंडचे पंतप्रधान लिओ वराडकर हे अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ते मूळचे भारतीय वंशाचे आहेत. त्यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्याशी हस्तांदोलन न करता नमस्ते केले. यावरून पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावेळी ते म्हणाले, मी काही दिवसांपूर्वीच भारतातून परतलो. तिथे असताना मी कोणाशीच हस्तांदोलन केले नाही. कारण तिथे नमस्ते करण्याची पद्धत आहे आणि ती खूप सोपी आहे. आपले दोन्ही हात जोडून नमस्ते करीत त्यांनी ही माहिती दिली. 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडोंच्या पत्नीला कोरोनाची लागण

कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे जगातील अनेक देशांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. भारताने १५ एप्रिलपर्यंत काही देशातील नागरिकांना व्हिसा देण्यावर तूर्त बंदी घातली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.