पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

किम जोंग उन यांच्याबद्दलचे ते वृत्त डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळले

डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग उन

उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा हुकूमशहा किंम जोंग उन यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी फेटाळले. हे वृत्त देणारे अमेरिकेतील सीएनएन वाहिनीवरही त्यांनी उपरोधिकपणे टीका केली. अर्थात डोनाल्ड ट्रम्प आणि सीएनएन वाहिनी यांच्यात सातत्याने वादविवाद होत असल्याचे दिसून आले आहे.

अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे ५०,००० जणांचा मृत्यू

व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, मला असं वाटते आहे की ते वृत्त चुकीचे आहे. सध्यातरी मी एवढेच सांगू शकेन. त्या वाहिनीने जुन्या रिपोर्टच्या आधारे ते वृत्त दिले, असे मला समजले.

अर्थात किम जोंग उन यांची प्रकृती सध्या कशी आहे, याबद्दल थेटपणे काही माहिती आहे का, याबद्दल कोणतेही उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी सीएनएनवरील ते वृत्त खोटे असल्याचाही आरोप यावेळी केला. या वाहिनीच्या पत्रकाराला पुढे कोणताही प्रश्न विचारू देण्यास त्यांनी नकार दिला.

मेट्रो, मान्सूनपूर्व कामे, पिठांच्या गिरण्यांना लॉकडाऊनमधून सूट

किम जोंग उन यांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त सीएनएन आणि अन्य काही अमेरिकी माध्यमांनी दिले होते. किम जोंग उन यांच्यावर ह्रदयशस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याचे या वाहिनीच्या वृत्तात म्हटले होते. अर्थात या वृत्ताचे स्रोत कोण आहेत, हे स्पष्ट करण्यात आले नव्हते.