पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फेसबुकवर मी नंबर १ तर मोदी दुसऱ्या स्थानी, ट्रम्प यांचा दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

फेसबुकवर मीच पहिल्या क्रमांकावर आहे तर  पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या क्रमांकावर आहे  असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. काही महिन्यांपूर्वी फेसबुकचे सहसंस्थापक मार्क झकरबर्गनं मला ही माहिती दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. मी भारत दौऱ्यावर जाणार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे असंही ट्रम्प म्हणाले. 

डोनाल्ड ट्रम्प हे २४ आणि २५ फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वी  डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटची चर्चा पहायला मिळत आहे.  ''मला वाटतं हा मोठा सन्मान आहे नाही का? फेसबुकवर मी नंबर १ आहे तर भारताचे पंतप्रधान दुसऱ्या क्रमांकावर आहे असं काही दिवसांपूर्वीच मला मार्क झकरबर्ग यानं  सांगितलं. मी दोन आठवड्यात भारतात जाणार  आहे यासाठी मी खूपच उत्सुक आहे" असं ट्रम्प म्हणाले. 

ट्रम्प यांना झोपड्या दिसू नयेत म्हणून भिंत बांधण्याची लगबग

काही दिवसांपूर्वी आठवड्याअखेरीस मोदींशी फोनवरुन संवाद साधल्याचंही ट्रम्प म्हणाले होते. कोट्यवधी लोक विमानतळापासून ते स्टेडिअमपर्यंत माझ्या स्वागतासाठी येणार आहेत असं मोदींनी मला सांगितलं असल्याचं ट्रम्प म्हणाले. 

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडिअममध्ये अमेरिकेमध्ये झालेल्या 'हाऊडी मोदी'सारख्या मोठ्या कार्यक्रमाची तयारी केली जात आहे. हे जगातील सर्वांत मोठ्या स्टेडिअमपैकी एक आहे. या कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प यांना ऐकण्यासाठी लाखो लोक स्टेडिअममध्ये उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

रामायण एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांसाठी भजनं, विविध प्रसंगांचे पेंटिंग्ज