पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ट्रम्प फेब्रुवारीत भारतात येणार, अहमदाबादमध्ये 'हाऊडी मोदी'सारखा कार्यक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. ज्याप्रमाणे अमेरिकेतील ह्यूस्टन येथे पंतप्रधान मोदी यांच्यासाठी 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचपद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठीही अशाच कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या योजनेवर काम सुरु आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये ह्यूस्टनमध्ये झालेल्या 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाच्या धर्तीवर ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यासाठी 'हाऊडी ट्रम्प' कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. यासाठी दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरु आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर या कार्यक्रमाशी निगडीत संबंधितांनी याबाबत माहिती दिली.

हिंदू अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या मुद्यावरुन भारताने पाकला सुनावले

ट्रम्प हे फेब्रवारीत भारत दौऱ्यावर येणे निश्चित असल्याचे 'हिंदुस्थान टाइम्स'ला समजले आहे. परंतु, दौऱ्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. ट्रम्प हे तीन दिवसांच्या दौऱ्यावर येतील असेही सांगण्यात येत आहे. या दौऱ्यात ते नवी दिल्लीसह आणखी एका शहराचाही दौरा करतील. अहमदाबादमध्ये हाऊडी मोदींच्या धर्तीवर ट्रम्प यांच्यासाठी कार्यक्रम होऊ शकतो. या कार्यक्रमात मोदीही सहभागी होण्याची शक्यता आहे.

पुणे मेट्रोसंदर्भात उप-मुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला मोठा

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुजराती वंशाचे अमेरिकन नागरिक हाऊडी ट्रम्प कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत यावर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्यासाठी त्यांची टीम या योजनेवर काम करत आहे. अमेरिकेत गुजरातींची संख्या जास्त आहे. त्यामुळेच ट्रम्प यांच्यासाठी हाऊडी मोदीसारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये भारतीय प्रवासी एक महत्त्वाची व्होट बँक आहे. 

जुन्या मित्रांच्या चांगल्या गोष्टींवर घाव घालणार नाही : CM ठाकरे

दरम्यान, या दौऱ्यात ट्रम्प आणि मोदी यांच्यात एका छोट्या व्यापार करारावर स्वाक्षरी होईल. गेल्यावर्षी भारतीय व्यापाऱ्यावर घालण्यात आलेले निर्बंध मागे घेतले जाऊ शकतात.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Trump India visit PM Narendra Modi Howdy Modi style event in the works for Donald Trump in Ahmedabad