पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकी संसदेच्या एका सभागृहात ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोग मंजूर

राष्ट्राध्य़क्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांच्याविरोधात महाभियोग

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांच्याविरोधात हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिवमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ट्रॅम्प यांच्यावर सत्तेचा गैरवापर करण्याचा गंभीर आरोप आहे.  ट्रॅम्प यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव २२९ विरुद्ध १९७ मतांनी मंजूर करण्यात आला आहे. हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिवमध्ये ट्रम्प  यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याच्या बाजूनं मतदान झाले आहे. अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष असलेल्या ट्रॅम्प यांना पुढील महिन्यात सीनेटच्या सुनावणीला सामोरं जावं लागणार आहे. 

पुलावरून कार पडली ट्रॅकवर, चालक जखमी

महाभियोग मंजूर झालेले ट्रम्प हे तिसरे राष्ट्राध्यक्ष आहेत. यापूर्वी अमेरिकेच्या इतिहासात  अ‍ॅण्ड्रय़ू जॉन्सन आणि बिल क्लिंटन या केवळ दोनच राष्ट्राध्यक्षांना महाभियोगाद्वारे दोषी ठरवण्यात आले आहे. तर ‘वॉटरगेट’ प्रकरणात राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी महाभियोगापूर्वीच राजीनामा  दिला होता. बुधवारी जवळपास १० तास हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिवमध्ये यावरून वादविवाद सुरु होता. तत्पुर्वी ट्रम्प यांनी आपल्यावरील महाभियोगाची कारवाई रद्द करावी अशी मागणी अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्याकडे केली होती. बुधवारी चर्चेला सुरुवात होण्याआधी अखेरचा प्रयत्न म्हणून ट्रम्प यांनी कारवाई मागे घेतली जावी यासाठी प्रयत्न केले होते मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. 

लष्कर प्रमुखांचा पाकला पुन्हा एकदा इशारा

ट्रम्प यांनी त्यांचे राजकीय वैरी असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी युक्रेनमध्ये केलेल्या तथाकथित गैरव्यवहारांची, युक्रेन सरकारने चौकशी करावी म्हणून युक्रेनवर दबाव आणला. हा दबाव आणण्यासाठी ट्रॅम्प यांनी  तब्बल तीन हजार कोटी रुपयांची मदत रोखून धरली असा आरोप आहे.