पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : रस्त्यावर सांडलेले मासे पळवण्यासाठी स्थानिकांची झुंबड

कानपूर अपघात

कानपूरमध्ये रस्त्यावर सांडलेले मासे घरी पळवून नेण्यासाठी  स्थानिकांची अक्षरश: झुंबड उडाली.  कानपूरमध्ये मंगळवारी एक विचित्र अपघात घडला. जिवंत माशांना बाजारात घेऊन चाललेला ट्रक रस्त्यात उलटला. त्यामुळे रस्त्यावर माशांचा खच पडला होता. मासे जिवंत होते. अशावेळी काही लोकांनी मासे घरी पळवून नेण्यासाठी रस्त्यावर गर्दी केली. 

चांद्रयान-२ ने पाठवला चंद्रावरील खड्ड्याचा 3D फोटो

पंखी विजयनगर भागात माशांना नेणार ट्रक उलटला. ट्रक मधले मासे रस्त्यावर सांडले. ही गोष्टी आजूबाजूच्या लोकांना समजताच पिशव्या, घरातली भांडी घेऊन त्यांनी अपघाताच्या ठिकाणी धाव घेतली. ताजे  मासे तेही फुकटात मिळत असल्यानं  लोकांनी अक्षरश: लुट माजवली. 

  

लोकांच्या गर्दीमुळे काहीकाळ इथे वाहतूक कोंडीही झाली होती. अखेर पोलिसांनी लोकांना  रस्त्यावरून हटवलं आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. लोकांनी अर्ध्याधिक माशांवर डल्ला मारल्यानं चालकाचंही खूप नुकसान झालं. 

चंद्रपूरच्या वीज केंद्रामध्ये वाघाचे दर्शन!