पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात; 7 ठार तर 10 जखमी

गुजरात अपघात

गुजरातमध्ये भीषण रोड अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. कच्छमधील मांकुवा भागामध्ये सोमवारी सकाळी हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने ऑटोरिक्षाला धडक दिली.

कुमारस्वामी यांच्या भवितव्याचा फैसला येत्या गुरुवारी

हा अपघात ऐवढा भीषण होता की अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचुर झाला आहे. तर रिक्षामधील 7 प्रवासी जागीच ठार झाले. तर अपघातामध्ये जखमी झालेल्या 10 जणांना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. या अपघाताचा तपास पोलीस करत आहेत. अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. तसंच अपघातग्रस्त रिक्षामधील प्रवासी कठून कुठे जात होते याची देखील माहिती अद्याप कळू शकलेली नाही. 

जगबुडी, वाशिष्ठी नदीला पूर; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प