पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तिहेरी तलाक विरोधी विधेयक असंविधानिक : असुदुद्दीन ओवेसी

असद्दुद्दीन ओवेसी

तिहेरी तलाक विरोधी विधेयकाला राज्यसभेत मिळालेली मंजुरी असंविधानिक असल्याचे मत एमआयएमचे खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देवू देईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. लोकसभेत मंजूर झालेल्या तिहेरी तलाक विरोधी विधेयकावर मंगळवारी राज्यसभेचीही मोहोर उमटली. त्यामुळे या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र ओवेसींनी या निर्णयाला आव्हान देता येईल, असे म्हटले आहे. 

पहिल्यापासून ओवेसी या विधेयकाला विरोध करत आहेत. एएनआयशी संवाद साधताना ते म्हणाले की, राज्यसभेत विधेयकाला मंजूर झाले. मात्र हे विधेयक असंविधानिक आहे. मुस्लिम समाजातील महिलांवर सरकार कायदा थोपवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल, असा विश्वासही त्यांनी  व्यक्त केला आहे.   

ऐतिहासिक निर्णय : तिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर

राज्यसभेत हे विधेयक ९९ विरुद्ध ८४ मतांनी मंजूर करण्यात आले होते. यामुळे यापुढे मुस्लिम विवाह पद्धतीने निकाह झालेल्यांना तीन तलाक पद्धतीने महिलेला घटस्फोट देता येणार नाही. तसे केल्यास तो गुन्हा ठरणार आहे. ओवीसींच्या म्हणण्यानुसार, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: TripleTalaq Bill is unconstitutional I hope the All India Muslim Personal Law Board will challenge it in the Supreme Court says AIMIM MP Asaduddin Owaisi