राज्यसभेत तिहेरी तलाक विरोधी विधेयकाला मंजूरी मिळाल्यानंतर मोदी सरकारवर शुभेच्छांचा वर्षा सुरु आहे. दुसरीकेड जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि यांनी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना टोला लगावला आहे. तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर झाल्यानंतर ओमर अब्दुला यांनी ट्विटरच्या माध्यमातून मेहबुबा मुफ्ती यांच्यावर निशाणा साधला. मेहबुबा मुफ्ती यांच्या पक्षाच्या अनुपस्थितीमुळे भाजपला विधेयक मंजूर करण्यास अप्रत्यक्षरित्या मदत झाली, असा आरोप त्यांनी केला आहे.
Mehbooba Mufti ji, you might want to check how your members voted on this bill before tweeting. I understand they abstained which helped the government with the numbers needed to pass the bill. You can’t help the government & then “fail to understand need to pass”! https://t.co/Z0Ma5ST5ko
— Omar Abdullah (@OmarAbdullah) July 30, 2019
राज्यसभेत तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर झाल्यानंतर मेहबुबा मुफ्तीने ट्विट केलंय की, तिहेरी तलाक विरोधी विधेयक आणण्याचा सरकारचा हेतू अद्यापही समजू शकलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने विधेयक अयोग्य घोषीत केल्यानंतर मुस्लिम समाजाला शिक्षा देण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करायला नको होतो. देशाची सध्याची अर्थव्यवस्था पाहता तीन तलाक विरोधी विधेयक प्राथमिक मुद्दा कसा असू शकतो? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
ऐतिहासिक निर्णय : तिहेरी तलाक विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर
मेहबुबा मुफ्ती यांचे हे ट्विट शेअर करुन ओमर अब्दुल्लांनी त्यांच्यावर तोफ डागली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, मेहबुबजी हे ट्विट करण्यापूर्वी राज्यसभेतील तुमच्या पक्षातील सदस्यांनी मतदान प्रक्रियेत सहभागी न होता भाजपची मदत केली आहे, असे म्हटले आहे.
उल्लेखनिय आहे की, मेहबुबा मुफ्ती यांनी यापूर्वीच तिहेरी तलाक विरोधी विधेयकाला विरोध दर्शवला होता. या विधेयकावरील चर्चेवेळी जेडीयू, अण्णाद्रुकच्या सदस्यांनी सभात्याग केल्यामुळे भाजप सरकारला राज्यसभेत विधेयकाला मंजुरी मिळवणे सहज सोपे झाले.