पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तृणमूल काँग्रेसचा शहांवर पलटवार, तुम्ही अगोदर दिल्ली सांभाळा!

तृणमूल काँग्रेसने अमित शहांवर पलटवार केला आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर तोफ डागणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर तृणमूल काँग्रेसने पलटवार केलाय. कोलकातामध्ये येऊन कायदा आणि सुव्यवस्था शिकवण्यापेक्षा शहांनी दिल्लीतील हिसांचाराची जबाबादारी स्विकारुन माफी मागावी, असे ट्विट ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि युवा तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिषेक बॅनर्जी यांनी केले आहे. राज्यातील जनता कट्टरता आणि भेदभावापासून दूर आहे, तुम्ही दिल्ली सांभाळा, असा टोला अभिषेक बॅनर्जी यांनी शहांना लगावला आहे.  

मोदी-शहांसह उद्धव ठाकेरेंचंही चांगल व्यंगचित्र काढता येईल: राज ठाकरे

अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, बंगालमध्ये येऊन उपदेश देण्याएवडी अमित शहा यांनी दिल्लीतील हिंसाचाराबाबत माफी मागायला हवी. तुमच्या समोर दिल्लीत अनेकांनी नाहक आपला जीव गमावला आहे, अशा शब्दांत त्यांनी शहांना सुनावले. ईशान्य दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या मुद्यावरुन पेटलेल्या आंदोलनातील हिंसाचारात आतापर्यंत ४२ जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. दिल्लीच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही अमित शहा यांच्याकडे आहे, असा उल्लेख अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. 

ममता दीदींनी राज्यात दंगल घडवून आणली : अमित शहा

कोलकाता येथील एका जाहीर सभेत अमित शहांनी तृणमूल काँग्रेस सरकारवर निशाणा साधला होता. ममता बॅनर्जी या कल्याणकारी योजनेमध्ये अडथळा निर्माण करत आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करत त्यांनी राज्यात हिंसाचाराला बळ दिले, असा आरोप अमित शहांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर तृणमूल काँग्रेसकडून अभिषेक बॅनर्जी यांनी शहांवर पलटवार केला.