पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना ममता बॅनर्जींचा झटका

ममता बॅनर्जी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी येत्या सोमवारी, १३ जानेवारी रोजी बोलाविलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे केंद्रातील भाजप सरकारविरोधात विरोधकांची आघाडी करण्याच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा खीळ बसली आहे. 

भाजप-मनसे यांच्यातील युतीसंदर्भात फडणवीस म्हणाले की...

डाव्या पक्षांकडून आणि काँग्रेसकडून सातत्याने ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांच्या बैठकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय ममता बॅनर्जी यांनी घेतला. केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदवेळी पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. या हिंसाचारासाठी विरोधकांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. विशेषतः काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी या हिंसाचारावरून ममता बॅनर्जी यांच्यावरच निशाणा साधला. त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हिंसाचार घडवून आणला, असा आरोप करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर आता ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांनी बोलाविलेल्या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला.

छपाकच्या श्रेयनामावलीत अपर्णा भट्ट यांना योग्य स्थान द्या - कोर्ट

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या निर्णयामुळे केंद्रातील भाजप सरकारविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना मोठी खीळ बसली आहे. सुधारित नागरिकत्व कायदा, प्रस्तावित एनआरसी यावरून देशात सध्या मोठा गदारोळ सुरू आहे. अनेक विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. या सर्व मुद्द्यांवरून आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्याचा विरोधकांचा प्रयत्न असणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Trinamool Congress boss Mamata Banerjee declared that she will stay away from an opposition meeting