पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

१५ एप्रिलनंतरच्या रेल्वेचे बुकिंग फुल्ल, सोशल डिस्टन्सिंगचं काय होणार ?

भारतीय रेल्वेचे संग्रहित छायाचित्र

देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंतच्या सर्व रेल्वे वाहतूक बंद आहेत. १५ एप्रिलपासून रेल्वे सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे रुळावर आल्यानंतर तिकिटांसाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. 

मुख्यमंत्री सहायता निधीत तीन दिवसांत ९३ कोटी जमा

दि. १५ एप्रिलपासून लखनऊतून मुंबई, हावडा आणि दिल्लीकडे जाणाऱ्या रेल्वेचे आरक्षण फुल्ल झाले आहे. काही रेल्वेच्या शयनयान श्रेणीचे तिकिट्स उपलब्ध आहेत. पण त्याची संख्या अत्यंत अल्प आहे. कोरोना विषाणूमुळे एकमेकांपासून अंतर राखणे गरजेचे असले तरी प्रवासी हे ऐकण्यास तयार नसल्याचे यावरुन स्पष्ट होते. १५ एप्रिलपासून रेल्वे स्थानकांवर गर्दी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फ़ॉर्म्युला अयशस्वी ठरणार असल्याचे बोलले जात आहे. 

म्हणून घराच्या दारात बसून चहा घेऊन परतलेल्या डॉक्टरांचा फोटो व्हायरल

दिल्लीला जाणाऱ्या काशी, गोरखधाम, अवध आसाम, फैजाबाद-दिल्ली, फरक्का, बिहार संपर्क क्रांती, वैशाली एक्स्प्रेससह सुमारे सर्वच रेल्वेतील तिसऱ्या श्रेणीतील एसीचे तिकीटे बुक झाली आहेत. तर स्लीपर श्रेणीतील फैजाबाद-दिल्ली आणि पद्मावत एक्स्प्रेसमधील काही जागा शिल्लक आहेत. २० एप्रिलपर्यंतच्या रेल्वे आरक्षणाची ही स्थिती आहे. 

धार्मिक कार्यक्रमात उपस्थिती लावलेले पुण्यातील ६० लोक विलगीकरणात

मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेची प्रतीक्षा यादी १००च्या पुढे गेली आहे. १५ एप्रिलला पुष्पक आणि अवध आसाममधील तिकिटेही आरक्षित झाली आहेत. अवध-आसामच्या स्लीपर श्रेणीची आरएसी तिकिटे मिळत आहेत. १६ एप्रिललाही पुष्पक, कुशीनगर आणि गोरखपूर-एलटीटी अशा कोणत्याही रेल्वेचे तिकीट शिल्लक नाही. केवळ गोरखपूर-एलटीटीमध्ये आरएसी तिकीटे मिळत आहेत.