पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गोव्यातील या प्रसिद्ध ठिकाणी फोटोसाठी भरावा लागणार ५०० रुपयांपर्यंत कर

पर्रा गाव

गोवा हे राज्य पर्यटनासाठी खूपच प्रसिद्ध आहे. देशातूनच नाही तर जगभरातून लाखो पर्यटक गोव्यात पर्यटनासाठी येतात. विषेशत: गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या जास्त आहे. गोव्यातील प्रसिद्ध  ठिकाणांपैकी पर्रा हे गाव पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. मात्र इथे फोटो काढण्यासाठी पर्यटकांना यापुढे १०० ते ५०० रुपयांपर्यंतचा 'स्वच्छता कर'  द्यावा लागणार आहे. ज्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजी आहे.

उत्तर गोव्यातील हे गाव गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचं गाव देखील आहे. अनेक बॉलिवूड तसेच परदेशी चित्रपटांचं चित्रीकरण या निसर्गरम्य गावात झालं आहे. त्यामुळे हे गाव पाहण्यासाठी अनेक पर्यटक पर्रामध्ये येतात. मात्र पर्रा ग्रामपंचायतीनं पर्यटकांकडून १०० ते ५०० रुपयांपर्यंतचा स्वच्छता कर  आकारण्याचा निर्णय घेतला आहे. एका फोटोसाठी पर्यटकांना हा कर द्यावा लागणार आहे. ज्याविरोधात तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. 

नेहरू स्मारक सोसायटीतून काँग्रेस नेते 'आऊट', अमित शहा 'इन'

पर्रा ग्रामपंचायतीच्या या निर्णयाविरोधात गोवा वाहतूक आणि पर्यटन संघटनेचे सॅविओ  मेस्सिआस यांनी नाराजी दर्शवली आहे. 'यामुळे पर्यटकांची पिळवणूक होईल. इतर गावंही अशाप्रकारे कर आकारायला सुरुवात करण्याआधीच हे थांबवायला हवं', असं सॅविओ आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले. 

पर्रा गावातील एक  रस्ता पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. या रस्त्याच्या दुतर्फा एका ओळीत नारळाची झाडं आहेत. शाहरुख- आलियाच्या 'डिअर झिंदगी' चित्रपटातील एक दृश्य इथे चित्रीत करण्यात आलं आहे. इथे फोटो काढण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाकडून गावकऱ्यांनी ५०० रुपयांचा कर आकारला. याची पावतीही दिली. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

हेरगिरीचा फटका, व्हॉट्स अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या ८०% नी घटली

पर्रात व्यावसायिक चित्रीकरण होत असेल तर कर आकारण्यास हरकत नाही मात्र पर्यटकांकडून अशा प्रकारे कर आकारणं चुकीचं आहे, असं मत पर्राचे माजी सरपंच बेन्डिक डिसुजा यांनी व्यक्त केलं आहे. 

मात्र पर्रा गावचे सरपंच लोबो यांनी कर आकारणं योग्यच असल्याचं म्हटलं आहे. अनेक पर्यटक गावात येतात रस्त्यावर कचारा करतात. गोंधळ घालतात. अनेकदा काही पर्यटक आपल्या गाड्या भर रस्त्यात उभ्या करतात त्यामुळे मोठी  वाहतूक कोंडी होते. या सर्व प्रकाराला यामुळे आळा बसेल असं लोबो यांचं म्हणणं आहे. 

पाकच्या कुरापती, कर्तारपूर व्हिडिओत खलिस्तानी नेत्यांचे पोस्टर