पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिलासादायकः देशात कोरोनाबाधित बरे होण्याचा दर २२ टक्क्यांपेक्षा जास्त

दिलासादायकः देशात कोरोनाबाधित बरे होण्याचा दर २२ टक्क्यांपेक्षा जास्त

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. परंतु, यादरम्यान एक चांगली बातमी समोर आली आहे. या आजारातून बरे होण्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, मागील एका दिवसात ३८१ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण बरे होणाऱ्यांची संख्या ६१८४ पर्यंत पोहोचली आहे. आपला रिकव्हरी रेट हा २२.१७ टक्के झाला आहे. आपला बरे होण्याचा दर वाढत आहे. 

'कोरोनाविरोधात लढताना अर्थव्यवस्थेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही'

तर, भारतात विदेशी नागरिकांसह कोरोना विषाणूबाधितांचा आकडा वाढून सोमवारी २७,८९२ इतका झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने सोमवारी आकडेवारी जाहीर केली. आतापर्यंत यात ८७२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या २०,८३५ जण बाधित आहेत. 

मागील २४ तासांत कोरोनाचे नवीन १३९६ प्रकरणे समोर आली आहेत. तर ४६ लोकांना या विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मागील २४ तासात कोरोना संक्रमित ३८१ लोक बरे झाले आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Total Coronavirus cured people becomes 6184 Recovery rate Over 22 Percent Says Health Ministry