पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग, सर्व विरोधकांची एकत्रित बैठक

विरोधकांची दिल्लीमध्ये बैठक

लोकसभेचे निकाल अवघ्या दोन दिवसांवर आलेले असतानाच राजधानी नवी दिल्लीमध्ये विविध हालचालींना वेग आला आहे. कोणत्याही स्थिती भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांनी कंबर कसली असून, त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये सर्व विरोधी पक्षांची एक बैठक झाली. या बैठकीला देशभरातील विविध पक्षांचे नेते किंवा प्रतिनिधी उपस्थित होते.

एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा आमच्या जागा वाढतील, शिवसेनेचा विश्वास

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीवेळी सर्व इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्रातील चिठ्ठ्या यांची फेरपडताळणी केली जावी, अशी मागणी पुन्हा एकदा विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगाकडे केली जाणार आहे. या बैठकीला काँग्रेस नेते अहमद पटेल, गुलामनबी आझाद, अशोक गेहलोत, अभिषेक मनू सिंघवी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बसपाचे नेते सतीशचंद्र मिश्रा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी, कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, द्रमुकच्या नेत्या कनिमोळी, राजदचे नेते मनोज झा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीद मेमन, नॅशनल कॉन्फरन्सचे देविंदर राणा हे सर्व उपस्थित होते.

निकालापूर्वीच भाजप उमेदवार गोपाळ शेट्टींची २ हजार किलो मिठाईची ऑर्डर

जर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट मशीन या मधील मतांचा आकडा एकसारखा आला नाही. तर काय करायचे, यावर अद्याप निवडणूक आयोगाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. जर एखाद्या मतदारसंघातील एकाही ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमधील मते जुळली नाहीत. तर त्या मतदारसंघातील सर्वच व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची मोजणी केली जावी. लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास टिकून राहण्यासाठी हे खूप आवश्यक आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे.