पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

खलिस्तान लिबरेशन फोर्सचा म्होरक्या 'हॅपी पीएचडी'ची लाहोरमध्ये हत्या

हरमीत सिंग

गेल्या अनेक वर्षांपासून भारतात वाँटेड असलेला खलिस्तान लिबरेशन फोर्सचा म्होरक्या हरमीत सिंग लाहोरमध्ये मारला गेला. आर्थिक वादातून लाहोरमधील स्थानिक टोळीकडून त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. पंजाबमध्ये २०१६-१७ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या हत्येमध्ये त्याचाच हात होता. सोमवारी दुपारी लाहोरमधील डेरा चहाल गुरुद्वाराजवळ त्याची हत्या करण्यात आली. हॅपी पीएचडी या टोपण नावाने तो कुख्यात होता.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग सहाव्या दिवशी घट, हे आहे कारण...

भारतात शस्त्रास्त्रांची तस्करी आणि अमली पदार्थांची बेकायदा विक्री करण्याच्या तसेच इतरही गुन्ह्यांमध्ये तो पोलिसांना हवा होता. खलिस्तान लिबरेशन फोर्सचा आधीचा म्होरक्या हरमिंदर मिंटो याला पंजाब पोलिसांनी २०१४ मध्ये थायलंडमध्ये अटक केली होती. त्यानंतर हरमीत सिंग हाच या संघटनेचा प्रमुख म्हणून काम पाहात होता. २०१८ मध्ये हरमिंदर मिंटो याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

प्रौढांसाठीचे व्हिडिओ बघण्याची बळजबरी केल्याने गणेश आचार्य अडचणीत

हरमीत सिंग अमृतसरमधील छेहरटा गावाचा रहिवासी होता. त्याने विद्यापीठातून डॉक्टरेटही मिळवली होती. त्यामुळेच त्याला हॅपी पीएचडी म्हणूनही संबोधले जायचे. गेल्या दोन दशकांपासून तो पाकिस्तानातच राहात होता. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारताच्या मागणीवरून इंटरपोलने एकूण आठ खलिस्तान्यांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. या आठ जणांमध्ये हरमीत सिंग यांचाही समावेश होता.