पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकशाहीच्या इतिहासातला काळा दिवस, मेहबुबा मुफ्तींची जाहीर नाराजी

मेहबुबा मुफ्ती

लोकशाहीच्या इतिहासातला आजचा दिवस हा काळा दिवस आहे. हा एकतर्फी निर्णय असून भारत सरकार काश्मीर प्रश्नी तोडगा काढण्यास अयशस्वी ठरलं अशी नाराजी जम्मू काश्मीर राज्याच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी बोलून दाखवली आहे. मध्यरात्रीपासून श्रीनगर आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू झालं  आहे. त्याचप्रमाणे अनेक नेत्यांना नजरकैदही झाली आहे. यात मेहबूबा मुफ्ती यांच्या समावेश आहे.

काश्मीर 'इफेक्ट':सेन्सेक्स ५५० हून अधिक अंकांनी 

जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेचा प्रस्ताव गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडला. त्यांनी कलम ३७० हटवण्याची शिफारस केली. त्यामुळे आता जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळणार.  या निर्णयामुळे देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मेहबुबा मुफ्तीं यांनी मात्र उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. 

काश्मीर प्रश्न निकाली लागायला सुरूवात झालीये - अनुपम खेर

लोकशाहीच्या इतिहासातला आजचा दिवस हा काळा दिवस आहे. भारत सरकारची धोरणं ही स्पष्ट आहेत. मुस्लिमांना आता त्यांच्याच राज्यात दुय्यम नागरिकांचा दर्जा मिळणार आहे. लोकशाही हे मंदिर आहे, संविधानावर आमची श्रद्धा आहे. मात्र आता ती मातीमोल झाली आहे.  जम्मू- काश्मिरच्या लोकांशी संवाद साधायचा आहे मात्र मला नजरकैदेत ठेवण्यात आला आहे. संविधानानं आम्हाला विशेष राज्याचा दर्जा दिला आहे मात्र आता त्याची पायमल्ली सुरू आहे, अशा शब्दांत मुफ्ती यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ट्विटरवर ट्विटची शृंखला पोस्ट करत त्यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.