पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तिसऱ्या अपत्याला मतदानाचा अधिकार देऊ नका - रामदेव बाबा

रामदेव बाबा

वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे देशभरात चर्चेत येणारे योगगुरू रामदेव बाबा यांनी पुन्हा एक नवीन मागणी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. देशातील लोकसंख्या रोखण्यासाठी प्रत्येक कुटुंबात जन्माला येणाऱ्या तिसऱ्या अपत्याला मतदानाचा अधिकार देण्यात येऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा देशाच चर्चेला उधाण येईल. एएनआयने या संदर्भात ट्विट केले आहे.

मुस्लिम युवकाला मारहाण करत 'जय श्री राम'ची घोषणा देण्याची बळजबरी 

रामदेव बाबा यांनी म्हटले आहे की, पुढच्या ५० वर्षांमध्ये आपल्या देशाची लोकसंख्या दीडशे कोटींच्यावर जायला नको. एवढी मोठी लोकसंख्या सांभाळण्यास आपण अजून तयार नाही. जर लोकसंख्या रोखायची असेल, तर त्यासाठी एकच उपाय आपल्या हातात आहे. तो म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये जर तिसरे मूल जन्माला आले, तर त्याला मतदानाचा अधिकारच देण्यात येऊ नये. त्याचबरोबर त्याला कोणत्याही निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार दिला जाऊ नये. सरकारी योजनांचे कोणतेही फायदा त्याला दिले जाऊ नयेत. यासाठी संसदेने कायदा करावा, असे त्यांनी म्हटले आहे. असे कठोर उपाय योजल्यासच लोकसंख्या नियंत्रणात राहू शकते, असे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. रविवारी एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले.

रामदेव बाबा योगविद्येसाठी देशभरात प्रसिद्ध असले, तरी ते वेगवेगळी वक्तव्ये करून कायम चर्चेत राहत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी नवीन वक्तव्य केले असून, त्यावर इतर नेते प्रतिक्रिया देण्याची शक्यता आहे.