पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

EVM च्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी आंदोलन छेडणार

ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी ईव्हीमसंदर्भात आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी मतदान बॅलेट पेपरच्या माध्यमातून घ्यावे अशी मागणी लावून धरण्याचा निर्धार केला आहे. यासंदर्भात त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही आवाहन केले आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ममता बॅनर्जी यांनी पक्षातील आमदार आणि राज्यातील मंत्र्यांची सोमवारी आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी  ईव्हीएम संदर्भातील प्रश्नांच्या पडताळणीसाठी 'फॅक्ट-फाइंडिंग' समितीची स्थापना करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. 
लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर बॅलेट पेपरचा वापर आवश्यक आहे. मतदान प्रक्रिया ही बॅलेट पेपरच्या माध्यमातून व्हावी यासाठी पश्चिम बंगालमधून आंदोलनास सुरुवात करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विरोधी पक्षातील २३ पक्षांच्या नेत्यांशी बॅलेट पेपरच्या मागणीसंदर्भात चर्चा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. 

आघाडीवर भरवसा ठेवू नका, मायावतींचे पुन्हा एकला चलो रे...

लोकसभा निवडणुकीत भाजपने देशभरात घवघवीत यश मिळवले होते. देशभरातील मोदींच्या त्सुनामीचा फटका पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्डी यांच्या पक्षाला बसला होता. भाजपने पश्चिम बंगालमध्ये चांगली कामगिरी करत तब्बल १८ जागा जिंकल्या होत्या. २०१४ मध्ये भाजपला याठिकाणी केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. तर ३४ जांगावर तृणमूल काँग्रेसने बाजी मारली होती. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:TMC will campaign from door to door Save democracy we dont want EVMs Says mamata banerjee