पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्ली पोलिस-वकील वाद; पोलिस मुख्यालयाबाहेर पोलिसांचे आंदोलन

दिल्ली पोलिस आंदोलन

दिल्लीतील तीस हजारी कोर्ट परिसरात शनिवारी पोलिस आणि वकिलांमध्ये झालेले हाणामारीचे प्रकरण वाढत चालले आहे. सोमवारी दिल्लीत वकिलांनी संप पुरकारला होता. या संपानंतर मंगळवारी सकाळी दिल्ली पोलिस मुख्यालयाबाहेर मोठ्या संख्येने दिल्ली पोलिस कर्मचारी आंदोलन करत आहेत. पोलिसांनी आपल्या हातात काळी फित बांधली असून वकिलांसोबत झालेल्या हाणामारीचा निषेध करत न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्राला लागलेले ग्रहण लवकरच सुटणार, संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य

सोमवारी बार असोसिएशनने २४ तासाचा संप पुकारला होता. दिल्ली उच्च न्यायालयासह इतर न्यायालयातील वकिलांनी या संपामध्ये सहभाग घेतला होता. दिल्ली व्यतिरिक्त देशाताली अन्य शहरांमध्ये देखील अशाप्रकारची प्रकरणं समोर आली आहेत. याआधी दिल्लीतील साकेत कोर्ट, कडकड्डूमा कोर्टाच्या बाहेर पोलिस-वकिल आमने सामने आले होते. सोबतच उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये सुध्दा वकिल आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली होती.

'मावळते मुख्यमंत्री' म्हणत शिवसेनेने फडणवीसांना डिवचले

उत्तर दिल्लीतील तीस हजारी कोर्ट परिसरात शनिवारी दुपारी काही पोलिस आणि वकिलांमध्ये हाणामारी झाली. हे प्रकरण ऐवढे वाढले की पोलिसांना गोळीबार करावा लागला होता. ज्यानंतर वकिलांनी पोलिसांच्या गाडीला पेटवून दिली. या ठिकाणी झालेल्या हाणामारीत आणि गोळीबारात काही जण जखमीही झाले होते. तीस हजारी कोर्टाच्या लॉक अपमध्ये वकिलाला जाण्यास पोलिसांनी रोखल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिस आणि वकिल आमने-सामने आले होते. 

मणिपूरमध्ये आयईडीचा स्फोट; ४ पोलिस गंभीर जखमी