पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दिल्लीतील तीस हजारी कोर्टातील त्या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर

सीसीटीव्ही फुटेजद्वारे टिपलेले छायाचित्र

दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात गेल्या शनिवारी पोलिस आणि वकिलांमध्ये झालेल्या हाणामारीचा नवा व्हिडिओ गुरुवारी समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका महिला पोलिस अधिकाऱ्याच्या मागे काही वकील धावत असल्याचे दिसते. त्याचवेळी तिच्या सोबत असलेले काही पोलिस कर्मचारी तिला घटनास्थळावरून दूर घेऊन जात असल्याचे दिसते. काही वकिलही संबंधित महिला अधिकाऱ्याला हल्ल्यापासून वाचवत असल्याचे दिसते.

नितीन गडकरी मुंबईत, राजकीय हालचालींसाठी भाजपकडे खूप कमी वेळ

गेल्या शनिवारी दुपारी दिल्लीत घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद आठवडाभर राजधानीमध्ये उमटत आहेत. दिल्लीतील पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी आयटीओमधील पोलिस मुख्यालयाबाहेर निदर्शने केली होती. तब्बल ११ तास निदर्शने केल्यावर वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी परत आपल्या कामावर जाण्याला प्राधान्य दिले होते. दुसरीकडे वकीलही या प्रकरणावरून आंदोलन करीत आहेत.

तीस हजारी न्यायालयाबाहेरील सीसीटीव्ही फुटेजमधून त्या दिवशी नेमके काय घडले हे दिसते आहे. या व्हिडिओमध्ये काही वकील संबंधित महिला अधिकाऱ्याच्या मागे जाताना दिसतात. तर काही जण त्या अधिकाऱ्याभोवती कवच करून तिला तेथून दूर घेऊन जात असल्याचे दिसते. या महिला अधिकाऱ्यासोबत असलेले काही कर्मचारीही तिचा बचाव करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते.

मोदी सरकारला झटका, मूडीजकडून आर्थिक रेटिंगमध्ये 'नकारात्मक' बदल

तीस हजारी न्यायालयात या महिला अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी स्वतंत्रपणे कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांनी सांगितले की या प्रकरणी वकिलांवर दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये याही प्रकरणाचा उल्लेख करून नव्याने कलम दाखल केले जाण्याची शक्यता आहे.