पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA विरोधी निदर्शनात सहभागामुळे परदेशी महिलेला मायदेशी परत जाण्याचे आदेश

जॅनी मेट्टे-जोहानसन

केरळमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील निदर्शनांमध्ये सहभाग घेतल्याबद्दल पर्यटन व्हिसा घेऊन भारतात आलेल्या नॉर्वेतील महिलेला मायदेशी परत जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जॅनी मेट्टे-जोहानसन असे या महिलेचे नाव आहे. दोन महिन्यांपूर्वी त्या भारतात आल्या होत्या.

'होय, हिंदू असल्यामुळेच मला पाक संघात भेदभाव सहन करावा लागला'

परदेशी नागरिकांच्या राज्यातील हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या परदेशी नागरिक प्रादेशिक नोंदणी कार्यालयाने हे आदेश दिले आहेत. या संदर्भात जॅनी यांची सखोल चौकशी करण्यात आली. त्यामध्ये त्यांनी व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. त्यामुळेच त्यांना मायदेशी परत जाण्याचे आदेश बजाविण्यात आले. पीटीआयने या संदर्भातील वृत्त दिले आहे.

परदेशी नागरिक प्रादेशिक नोंदणी कार्यालयाने ७४ वर्षांच्या जॅनी यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलाविले होते. त्यावेळी त्यांना सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनात २३ डिसेंबरला सहभागी होण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. यावेळी दिलेल्या उत्तरात जॅनी यांनी सांगितले की, मी कोचीमधील पोलिसांना आंदोलनात सहभागी होऊ शकते का, असे विचारले होते. त्यावेळी त्यांनी मला तसे करायला हरकत नाही, असे तोंडीच सांगितले. म्हणूनच मी आंदोलनात सहभागी झाले. 

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या, रेल्वे तिकीटाचे दर वाढण्याचे संकेत..

या चौकशीनंतर त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत चौकशीची प्रक्रिया खूपच वेळखाऊ आणि किचकट असल्याचे म्हटले होते. या संपूर्ण घटनाक्रमानंतर त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली असून, त्यामध्ये त्यांनी इमिग्रेशन विभागातील अधिकाऱ्यांनी आपण उतरलेल्या हॉटेलवर येऊन तिथे मला दमदाटी केल्याचा आरोप केला. जोपर्यंत परतीचे तिकीट दाखवत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही, असे त्या अधिकाऱ्याने म्हटल्याचे जॅनी यांनी लिहिले आहे.