पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशपातळीवर NRC करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय नाही - गृहराज्यमंत्री

संसद

देशपातळीवर राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (NRC) करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी दिली. लोकसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरामध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी या दोन्ही मुद्द्यांवरून देशातील वातावरण सध्या ढवळून निघाले आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला अनेक नागरिकांचा विरोध आहे. विरोधी पक्षांनीही याला विरोध केला आहे. काही राज्य सरकारांनी त्यांच्या विधीमंडळात ठराव करून एनआरसी करू देणार नसल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिलेले उत्तर महत्त्वाचे मानले जात आहे.

पुण्यात गोळीबार करत दोन ते तीन गाड्यांची तोडफोड

काही महिन्यांपूर्वी संपूर्ण देशात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी करण्यात येईल, असे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात आले होते. सुधारित नागरिकत्व कायदा संसदेत मंजूर झाल्यानंतर या स्वरुपाची विधाने करण्यात आली होती. त्यानंतर देशात विविध ठिकाणी आंदोलने सुरू झाली आहे. दिल्लीत शाहिन बागमध्ये बऱ्याच दिवसांपासून सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात आंदोलन सुरू आहे.