पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टिकटॉक सेलिब्रिटी मोहित मोरची गोळ्या घालून हत्या

मोहित मोर

टिकटॉक या सोशल मीडिया अ‍ॅपवर प्रसिद्ध असणाऱ्या दिल्लीतील २७ वर्षीय जीम ट्रेनरची भररस्त्यात गोळ्या घालून  हत्या करण्यात आली. दिल्लीमधील नजफगढ येथे मंगळवारी संध्याकाळी तिघांनी गोळ्या घालून मोहित मोरची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. मोहित हा टिकटॉकवर  खूपच प्रसिद्ध होता; त्याचे या अ‍ॅपवर ५.१७ लाख फॉलोअर्स होते.  मोहीत हा मुळचा हरियाणामधील बहादूरगड येथील  रहिवाशी असून दिल्लीत राहत होता. त्याच्या हत्येचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

रविवारी द्वारका मोड येथे गँगवॉर झाला  यामध्ये दोन गुन्हेगारांचा मृत्यू झाला होता. याचदरम्यान मोहित मोर याची हत्या झाली आहे. यामुळे मोहितच्या हत्येचा थेट या  गँगवॉरशी काही संबंध होता  का याचा तपास पोलिस करत आहेत. मात्र गँगवारशी या हत्येचा संबध असल्याची माहिती अद्यापतरी समोर आली नसल्याचं पोलिस उपायुक्त अँटो अल्फॉन्से म्हणाले. 

मोर यांच्यावर कोणत्याही गुन्हाची नोंद नव्हती अशी माहिती अल्फॉन्से यांनी हिंदूस्थान टाइम्सशी बोलताना दिली.  ‘मोहितच्या कॉल रेकॉर्डची तपासणी केली असता गेल्या काही दिवसांत त्याने अनेकांशी संवाद साधल्याचं समोर आलं आहे. अनेकांशी त्याची मैत्री होती. त्या मैत्रीमुळेच  हत्या घडली का याचाही तपास पोलिस घेत असल्याचं अँटो म्हणाले. 

मोहित मंगळवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका फोटोकॉपी शॉपमध्ये बसला त्यावेळी त्याच्यावर हल्लेखोरानं  सात गोळ्या  झाडल्या. या हल्ल्यात मोहितचा जागीच मृत्यू झाला. पोलीस सीसीटीव्हीच्या सहाय्याने आरोपींचा शोध घेत असून, याप्रकरणी नजफगढ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहितच्या हत्येनंतर काही माणसं पळत जाताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. त्यातल्या दोघांच्या चेहऱ्यावर हेल्मेट होतं तर एकाचा चेहरा हा उघडा होता. पोलिस  सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.