पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फाशीपूर्वी अंतिम इच्छा विचारली

दिल्ली बलात्कार प्रकरणातील दोषी

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रकरणातील चारही दोषींना त्यांची अंतिम इच्छा कारागृह प्रशासनाकडून विचारण्यात आली आहे. येत्या १ फेब्रुवारीला चारही दोषींना फाशी देण्यात येईल. विनय शर्मा, अक्षयकुमार सिंग, मुकेश कुमार सिंग आणि पवन अशी या चौघांची नावे आहेत.

मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा; विनोद पाटलांची CMकडे तक्रार

कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, चारही दोषींना त्यांची अंतिम इच्छा गेल्याच आठवड्यात विचारण्यात आली. पण त्यांनी याला प्रतिसाद दिलेला नाही. लेखी स्वरुपात त्यांच्याकडे ही विचारणा करण्यात आली. पण त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नसल्याचे अतिरिक्त कारागृह महासंचालक राजकुमार यांनी सांगितले.

राजकुमार म्हणाले, एकदा चौघांनी त्यांची अंतिम इच्छा सांगितल्यावर ती पूर्ण करता येईल की नाही याचा निर्णय कारागृह प्रशासनाकडून घेतला जाईल. फाशीची शिक्षा सुनावलेल्यांची प्रत्येक अंतिम इच्छा पूर्ण करता येईलच असे होत नाही. त्यामुळे एकदा त्यांचा प्रतिसाद बघितल्यावर आम्ही निर्णय घेऊ.

सत्तेत बसलेली लोकं खरी 'तुकडे-तुकडे गँग': पी. चिदंबरम

कोणाची भेट घ्यायची असेल तर ते सुद्धा सांगावे, असेही या चौघांना सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांच्या नावावर काही संपत्ती असेल तर ती कोणाकडे द्यावी, हे सुद्धा त्यांना विचारण्यात आले आहे, असेही राजकुमार यांनी सांगितले.