पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अमेरिकेतील प्राणीसंग्रहालयात वाघिणीला कोरोनाची लागण

अमेरिकेत वाघिणीला कोरोना

जगभरात कोरोना विषाणूचे थैमान वाढत चालले आहे. या विषाणूमुळे दिवसेंदिवस मृतांचा आकडा वाढत चालला आहे. आशातच आता अमेरिकेमध्ये एका वाघिणीला कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आता प्राण्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आल्यामुळे भारतासह संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. 

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ७८१ वर

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील ब्रॉन्क्स प्राणी संग्रहालयात असलेल्या वाघिणीला कोरोनाची लागण झाली आहे. नादिया असं या ४ वर्षांच्या वाघिणीचे नाव आहे. या वाघिणीला ताप आला होता त्यानंतर तिची तपासणी करण्यात आली तर तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. या प्राणी संग्रहालयाने सांगितले की, याठिकाणी काम करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्यामार्फत वाघिणीला कोरोनाची लागण झाली असावी. 

पिंपरी-चिंचवडमध्ये ४२ डॉक्टर्स आणि ५० कर्मचारी क्वारंटाइन

नादिया वाघिणीची बहीण अजुल, अमूर टायगर्स आणि ३ अफ्रिकन सिंहांमध्ये अशाच प्रकारची लक्षणं दिसून आली आहेत. त्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. या घटनेनंतर आता भारतातील सर्व प्राणी संग्रहालयात हाय अलर्ट देण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व प्राण्यांवर २४ तास लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सेंट्रल जू अथॉरिटीने सांगितले. 

अमेरिकेत कोरोनामुळे २४ तासांत १२०० जणांचा मृत्यू