पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक: ग्रहणकाळात तीन विशेष मुलांना जमिनीत पुरले

विशेष मुलांना जमिनीत पुरले

आजही आपला समाज किती अंधश्रध्देमध्ये अडकला आहे याचा प्रत्यय कर्नाटकामध्ये दिसून आला आहे.  ग्रहणकाळात तीन मुला-मुलींना गळ्यापर्यंत जमिनीमध्ये पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे तिन्ही मुलं विशेष असून ग्रहण काळात जमिनीमध्ये पुरुन ठेवल्यामुळे त्यांचे व्यंग दूर होईल या समजुतीतून हा प्रकार करण्यात आला आहे.

 

राहुल गांधी खोटे बोलणाऱ्यांचे सरदार, भाजपचा पलटवार

कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील ताजसुल्तानपूर गावात ही घटना घडली आहे. आज सकाळी कंकणाकृती सूर्य ग्रहण देशातील अनेक ठिकाणी पहायला मिळाले. हे ग्रहण अनेकांनी पाहिले. पण हे ग्रहण सुरु झाल्यापासून कर्नाटकमध्ये या तिन्ही विशेष मुलांना गळ्यापर्यंत जमिनीमध्ये पुरण्यात आले होते. ग्रहण संपेपर्यंत ही मुलं तशीच होती. असे केल्यामुळे आपली मुलं बरी होतील असा विश्वास त्यांच्या पालकांना होता. या मुलांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

तुकडे-तुकडे गँगला जनेतेने धडा शिकवावाः अमित शहा

गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून कंकणाकृती सूर्य ग्रहण सुरु झाले. तर ११.३० वाजता हे ग्रहण संपले. ग्रहण काळामध्ये खाणे-पिणे टाळले जाते. देवाचे नामस्मरण केले जाते. ग्रहण काळात झोपू नये, घराची साफ सफाई करु नये असे सांगितले जाते. तसंच ग्रहण संपले की स्नान करावे असेही बोलले जाते.

'देशात अराजकता माजवण्याचा कट RSS आणि भाजप सरकारनेच

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:three specially abled children were buried up till the neck at Tajsultanpur village in karnataka