पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरमध्ये हिमस्खलन; तीन जवान शहीद

हिमस्खलनात तीन जवान शहीद

जम्मू-काश्मिरमध्ये गेल्या ४८ तासांपासून जोरदार बर्फवृष्टी होत आहे. याच दरम्यान जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये हिमवादळ सुध्दा आले आहे. हिमस्खलन होऊन ३ जवान शहीद झाले. तर एक जवान बेपत्ता झाला असून त्यांचा शोध सुरु आहे. कुपवाडाच्या माच्छिल सेक्टरमध्ये ही घटना घडली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरेज आणि रामपूर सेक्टरमध्ये सुध्दा हिमस्खलनाच्या अनेक घटना घडल्या आहेत.

जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजः उदयनराजे

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या ४८ तासांमध्ये अनेक भागांमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली. त्यामुळे उत्तर काश्मीरच्या काही भागात हिमस्खलनाच्या घटना घडल्या. यामध्ये तीन जवान शहीद झाले आहेत. तर एक जवान बेपत्ता झाला असून त्यांचा शोध सुरु आहे. तर हिमस्खलनाखाली अडकलेल्या काही जवानांना वाचवण्यात यश आले आहे. 

'बांगलादेशमधील स्थलांतरित इन्फोसिसचा CEO झालेला बघायला

पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे जम्मू-काश्मीरमधील तापमानात खूप कमी झाले आहे. श्रीनगरमधील तापमान शून्य डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरील विमानसेवा बंद झाली आहे. तसंच जम्मू-काश्मीरमधील अनेक रस्ते बंद पडले आहेत. हवामान खात्याने श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. 

मोदी सरकारपुढे आता महागाईचे संकट, काँग्रेसची जोरदार टीका