पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पशुधन चोरीचा आरोप; गावकऱ्यांच्या मारहाणीत तिघांचा मृत्यू

बिहारमध्ये मॉब लिचिंग

बिहारमध्ये पुन्हा एकदा मॉब लिचिंगची घटना समोर आली आहे. पशुधन चोरीचा आरोप करत गावकऱ्यांनी ४ जणांना बेदम मारहाण केली. यामध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बिहारच्या सारण जिल्ह्यात्या बनियापूर भागामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये देखील अशीच घटना घडली होती. बकरी चोरीच्या आरोपावरुन गावकऱ्यांनी तिघांना बेदम मारहाण केली होती.

चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मांचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेशाची चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सकाळी घडली आहे. गावातील लोकांनी ४ जणांना पशुधन चोरीच्या आरोपावरुन पकडले. त्यानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी पोलिसांना न कळवता या सर्वांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावामध्ये तणावाचे वातावरण आहे. तर मृतांच्या कुटुंबियांनी आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

गरिबांची मते विकत घेऊन भाजप सत्तेत आला; मायावतींचा आरोप

स्थानिक गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चौघे जण एका व्यक्तीच्या घरामध्ये पशुधन चोरीसाठी घुसले. त्याचवेळी त्यांना ग्रामस्थांनी पकडले. त्यानंतर सर्वांनी मिळून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण सुरु असताना चौघे ही गावकऱ्यांची माफी मागत होते. मात्र संतप्त जमावाने त्यांचे एकही न ऐकता मारहाण करतच राहिले. गावकऱ्यांच्या मारहाणीमध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणाचा तपास सुरु आहे. तसंच दोषींच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. मात्र अद्याप याप्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 

कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदत देऊ - पाकिस्तान