पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; आयईडीसह तिघांना अटक

संशयित दहशतवाद्यांना अटक

दिल्ली पोलिसांनी मोठा दहशतवादी कट उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सोमवारी आयईडीसह तीन संशयितांना अटक केली. पोलिसांनी या तिघांना आसामच्या गोलपाडा येथून अटक केली आहे. हे तिन्ही संशयित आरोपी आयएसआयएस या दहशतवादी संघटनेशी जोडलेले असल्याचे सांगितले जात आहे.

पदभार स्वीकारल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात आधी केले हे काम

संशयित आरोपींनी दिल्लीमध्ये हल्ला करण्याचा कट रचला होता. रंजीत अली, इस्लाम आणि जमाल अशी त्यांची नावं आहेत. उज्जेनमध्ये झालेल्या रेल्वे स्फोटाशी त्यांचा संबंध असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कारण ज्या वस्तूंचा वापर करुन रेल्वेमध्ये स्फोट घडवून आणला होता. त्याच पध्दतीच्या वस्तू त्यांच्याकडे सापडल्या आहेत. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. 

सिंचन घोटाळ्यातील ९ फाईल्स क्लोज, पण..

दिल्ली पोलिस स्पेशल सेल डीसीपी प्रमोद कुशवाहा यांनी सांगितले की, पोलिसांनी आयईडीच्या साठ्यासह संशयित आरोपींना अटक केली आहे. हे तिघे जण ही मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते. अटक करण्यात आलेले आरोपी दिल्ली, आसामसह अनेक राज्यात हल्ला करण्याच्या तयारीत होते. 

'संजय राऊतांना वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करावे लागेल'