पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गोवाः भाजपत आलेल्या काँग्रेसच्या बंडखोर आमदारांसह चौघांना मंत्रिपद

गोवा मंत्रिमंडळात नव्याने चौघांचा समावेश करण्यात आला (ANI)

काँग्रेस सोडून भाजपत आलेल्या काँग्रेसच्या १० पैकी तीन आमदारांना शनिवारी गोवा सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यामध्ये काँग्रेसचे माजी नेते फिलिप नेरी, जेनिफर मोन्सेरात, माजी विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर त्याचबरोबर विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मिशेल लोबो यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. 

तत्पूर्वी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शनिवारी चार मंत्र्यांना कॅबिनेटपदावरुन हटवले होते. यामध्ये विजय सरदेसाई, विनोद पालिनकर, भाजपचे सहयोगी गोवा फॉरवर्ड ब्लॉकचे जयेश साळगावकर आणि अपक्ष आमदार रोहन खुंटे यांचा समावेश होता. तर विधानसभेचे उपाध्यक्ष मिशेल लोबो यांनी मंत्रिपद मिळण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिला होता. 

दरम्यान, गोव्यामध्ये काँग्रेसच्या १५ पैकी १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या आमदारांनी दिल्लीमध्ये भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.  त्याचसोबत त्यांनी गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट देखील घेतली होती. 

अँटोनसिया मोन्सेरात यांना मंत्रिपद दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पण त्यांच्या जागेवर त्यांची पत्नी जेनिफर यांना संधी देण्यात आली. तर काँग्रेसचे आणखी एक नेते चंद्रकांत कावळेकर हे बुधवारपर्यंत विरोधी पक्षनेते होते, त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार आहे. त्याचबरोबर शहर नियोजनाची महत्वाची जबाबदारी त्यांना दिला जाण्याची शक्यता आहे.