पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : कालव्यात डॉल्फिन, दुर्मिळ दृश्य पहायला हजारो गावकरी

प्रदूषित पाण्यामुळे डॉल्फिनचा मृत्यू

पश्चिम बंगालमधील भागाबनपूर गावात एक दुर्मिळ घटना घडली. या गावातून वाहणाऱ्या कालव्यात चक्क डॉल्फिन आला. हे दृश्य  पाहण्यासाठी हजारो गावकऱ्यांनी कालव्याच्या आजूबाजूला गर्दी केली होती. 

डॉल्फिन हे सहसा समुद्रात किंवा नदीमध्ये आढळतात. त्यामुळे दुर्मिळ दृश्य पाहण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी जमली. या गर्दीमुळे कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी इथे पोलिसांचाही पाहारा होता. 

अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील १२ जणांना विषबाधा

इंडियन फॉरेस्ट ऑफिसर प्रवीण कासवान यांनी याचा व्हिडिओ ट्विट केला आहे. डॉल्फिनला पाहण्यासाठी १० हजारांहून अधिक लोक आले होते असंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

या डॉल्फिनला वनधिकाऱ्यानं शुक्रवारी कित्येक तासांची  मेहनत घेऊन पुन्हा नदीत सोडलं. मात्र शनिवारी या डॉल्फिनचा मृत्यू झाला. कालव्यात पाणी खूपच प्रदूषित होतं, त्यामुळे आम्ही डॉल्फिनला वाचवू शकलो नाही अशी माहिती स्थानिक वनधिकारी स्वागता दास यांनी दिली. 

गोव्यात मिग विमान कोसळले, वैमानिक सुरक्षित