पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मन की बात': मुख्य प्रवाहात येण्यास काश्मिरी उत्सुक- पीएम मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

जम्मू-काश्मीरमधील लोक विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी उत्सुक आहेत. राज्य आणि देशातील विकासात चढाओढीने भाग घेण्यासाठी उत्साह पाहायला मिळत आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या आपल्या कार्यक्रमात व्यक्त केले. दुसऱ्या कार्यकाळातील 'मन की बात'चा दुसरा कार्यक्रम होता. यामध्ये त्यांनी विकास कार्यक्रमांपासून जल संकट, चांद्रयान २ अभियानावरुन देशातील शिक्षण संस्थांमध्ये विज्ञानाप्रती आवड निर्माण करण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या प्रश्नमंजुषासारख्या कार्यक्रमांचा उल्लेख केला. 

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी जम्मू-काश्मीरमधील शोपियांचे रहिवासी मोहम्मद अस्लम यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, अस्लम यांनी नरेंद्र मोदी अॅपवर कम्युनिटी मोबिलायजेशन कार्यक्रम 'बॅक टू व्हिलेज'ची माहिती दिली. अस्लम यांच्या सांगण्यावरुन काश्मीरचे लोक मुख्य विकासधारेशी जोडण्यासाठी उत्सुक असल्याचे समजते. ग्रामस्थांनी या कार्यक्रमात आपली समस्या खुलेपणाने सांगितली. यावेळी अधिकाऱ्यांनी दोन दिवस आणि एक रात्र गावात व्यतीत केली. अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शोपियां, पुलवामा, कुलगाम, अनंतनाग येथील गावांमध्ये अधिकाऱ्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. विकासाची शक्ती बॉम्ब, बंदुकीच्या शक्तीवर भारी पडते. जे लोक तिरस्कार पसरवू इच्छितात. ते आपले मनसुबे प्रत्यक्षात उतरवण्यात कधीच यशस्वी ठरणार नाहीत.

पंतप्रधान मोदींनी २२ जुलै रोजी अंतराळात झेप घेतलेल्या चांद्रयान मिशन २ चा उल्लेख केला. त्यांनी म्हटले की, चांद्रयान २ मोहिमेतून दोन धडे मिळाले. चांद्रयान मिशन २ अनेक बाबतीत विशेष आहे. चांद्रयान २ मुळे विश्वास, निर्भिडतेचा धडा मिळाला आहे. आपण आपल्या बुद्धीमत्तेवर विश्वास ठेवला पाहिजे, आपल्या प्रतिभेवर विश्वास ठेवला पाहिजे. चांद्रयान २ हे संपूर्ण देशाचे अभियान आहे.

कोणत्याही अडथळ्यांना घाबरु नये. शास्त्रज्ञांनी दिवस-रात्र एक करत चांद्रयानातील तांत्रिक दोष त्वरीत दूर केले. अडथळे आले तरी चांद्रयान ईप्सित स्थळी पोहोचण्याची वेळ बदलण्यात आली नाही. आपल्या जीवनातही अडथळे येतात. ती पार करण्याची क्षमता पण आपल्यामध्ये असते, हा यातून धडा मिळतो. आता सप्टेंबर महिन्याची प्रतिक्षा आहे. जेव्हा लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रावर उतरेल त्याची आता आतुरतेने वाट पाहत आहोत.

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Those trying to spread hate obstruct development in Kashmir will never succeed PM Modi in mann ki baat