पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनावर लष्करप्रमुखांची टीका

लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात होणाऱ्या आंदोलनांवर मावळते लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी टीका केली. गर्दीमधून नेत्यांचा जन्म होतो हे खरे असले तरी लोकांना अयोग्य दिशेने नेणारे नेते होऊ शकत नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. बिपीन रावत लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत.

तुकडे-तुकडे गँगला जनेतेने धडा शिकवावाः अमित शहा

ते म्हणाले, लोकांना अयोग्य दिशेने नेणारे नेते म्हटले जाऊ शकत नाहीत. सध्या विद्यापीठातील, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि इतर काही जणांकडून शहरांमध्ये आंदोलनाच्या नावाखाली जो हिंसाचार सुरू आहे. त्याला आपण नेतृत्त्व म्हणू शकत नाही. नेतृत्त्व करणे हे वाटते तितके सोपे नाही. ते सोपे वाटत असले, तरी ते तसे नक्कीच नाही. ती जटील प्रक्रिया आहे. जेव्हा नेता पुढे जातो तेव्हा सगळे त्याच्या मागे जात असतात. 

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला संसदेने मंजुरी दिल्यानंतर या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली. या सुधारित कायद्याविरोधात देशाच्या विविध भागांत आंदोलने, निदर्शने करण्यात आली. उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक या राज्यांमध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामध्ये काही जणांना प्राणांना मुकावे लागले तर अनेक जण जखमी झाले.

भाजपच्या मित्रपक्षांना नागरिकत्व कायदा - एनआरसीवरून काय वाटते?

दरम्यान, बिपीन रावत यांच्या वक्तव्यावर एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दिन ओवेसी यानी टीका केली. ते म्हणाले, नेतृत्त्वाला आपल्या कार्यालयाच्या मर्यादाही समजल्या पाहिजेत. आपण ज्या कार्यालयाचे नेतृत्त्व करीत आहोत. त्याचे पावित्र्यही आपण जपले पाहिजे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.