पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कोणालाही उचलून तुरुंगात टाकायला, देशात आणीबाणी नाही'

नरेंद्र मोदी

भ्रष्टाचार संपविण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. पण या मुद्द्यावरून कोणालाही उचलून तुरुंगात टाकायला, देशात आणीबाणी नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले.

लोकसभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर मंगळवारी आपले विचार मांडले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत विरोधकांनी उपस्थित केलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांना उत्तर दिले.

'राजकारणापलीकडे जाऊन देशवासियांच्या इच्छा, आकांक्षापूर्तीची वेळ'

नरेंद्र मोदी म्हणाले, भ्रष्टाचार संपविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. काही लोकांना तुरुंगात टाकत नाही, म्हणून काहीजण आमच्यावर टीका करतात. पण या मुद्द्यावरून कोणालाही तुरुंगात डांबायला देशात आणीबाणी नाही. कोणाल शिक्षा द्यायची हे ठरविण्याचे काम न्यायपालिकेचे आहे. ते आमचे काम नाही. जर न्यायपालिका कोणाला जामीन देत असेल, तर त्याने एन्जॉय करावा. देशाने आम्हाला खूप काही दिले आहे. त्यामुळे आम्ही आमच्या मार्गावरून कधीच बाजूला सरकणार नाही, असेही नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.