पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रेल्वे पोलिसांचा उद्दामपणा; वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराला मारहाण, तोंडावर लघुशंका

घटनास्थळाचे छायाचित्र

धिमानपुरामध्ये मालगाडी रुळांवरून घसरल्याचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या वार्ताहराला रेल्वे पोलिसांनी GRP मंगळवारी रात्री उशीरा बेदम मारहाण केली आणि त्याच्याकडील कॅमेरा हिसकावून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. अमित शर्मा असे पत्रकाराचे नाव आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचबरोबर त्यांनी माझ्या तोंडात लघुशंका केली, असे अमित शर्माने यांनी म्हटले आहे. मी काय सांगतोय, हे ऐकण्याच्या मनःस्थितीतच पोलिस नव्हते, असे त्यांनी सांगितले.

या घटनेबद्दल माहिती मिळाल्यावर अनेक जण पोलिस ठाण्यात गेले. तिथे अमित शर्मा यांना होत असलेल्या मारहाणीचे शूटिंग करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. काही पत्रकारांनी याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारही केली आहे. 

जहाल नक्षलवादी नर्मदाला हैदराबादमधून अटक

या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, रेल्वे पोलिसांनी राकेश कुमार आणि सुनील कुमार या दोन पोलिसांना तातडीने निलंबित केले आहे. पत्रकार अमित शर्मा याची सुटका करण्यात आली आहे.

रेल्वे पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांकडून घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. आम्ही संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करू, असे शामलीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक अजयकुमार पांडे यांनी म्हटले आहे.