पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बंदूक हिसकावून आरोपीने पहिली गोळी झाडली : पोलीस आयुक्त

पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार

हैदराबादमध्ये पशु वैद्यकीय डॉक्टरवर सामूहिक पाशवी बलात्कार करून तिला जिवंत जाळणारे चार नराधम शुक्रवारी सकाळी पोलिस एन्काऊंटरमध्ये मारले गेले. हैदराबादमधील घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली असताना हैदराबाद पोलिसांनी आरोपींचा खात्मा केला. या घटनेनंतर हैदराबाद पोलिसांच्या कृत्यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणाची मानवाधिकार आयोगाने स्वत: दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीसाठी आम्ही तयार आहोत, असेही पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषद घेऊन पोलीस आयुक्तांनी सर्व प्रकाराची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. 

 

हैदराबाद एन्काऊंटर: मानवाधिकार आयोगाने दिले चौकशीचे आदेश

पोलीस आयुक्त व्ही. सी. सज्जनार म्हणाले की, चार आरोपींना गुन्हा केलेल्या ठिकाणी चौकशीसाठी आणण्यात आले होते. त्यावेळी आरोपींनी पोलिसांवर सुरुवातीला स्टीकने हल्ला केला. त्यानंतर शस्त्रे हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या सर्व प्रकारानंतर त्यांना शरण येण्याचा इशारा दिला. पण त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे आत्मरक्षणार्थ आम्हाला त्यांच्यावर गोळीबार करावा लागला. मोहम्मद आरिफ या आरोपीने सर्वात पहिली गोळी झाडली. यात दोन पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

हैदराबाद एन्काऊंटर: पाहा नक्की काय घडले

आम्ही घटनास्थळावरुन पीडितेचा मोबाईल जप्त केला आहे. चारही आरोपींचे मृतदेह  शवविच्छेदनासाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात पाठवण्यात यणार असल्याचेही ते म्हणाले. कर्नाटकातील काही प्रकरणामध्येही या आरोपींचा सहभाग असल्याचा संशय असून याबाबत तपास सुरु असल्याचेही ते म्हणाले.