पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दिल्लीत मतदानानंतर सरकार शाहिन बागेचे रुपांतर जालियनवाला बागेत करू शकते'

असदुद्दिन ओवेसी

दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकार शाहिन बागेचे रुपांतर जालियनवाला बागेत करू शकते. बळाचा वापर करून सरकार तेथील आंदोलकांना तिथून हटवू शकते. त्यांच्यावर गोळ्याही झाडू शकते, असा गंभीर आरोप एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी केला आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी हा गंभीर आरोप केला.

स्वराज्यरक्षक संभाजी : पवारांना यात गोवण्याचा प्रयत्न हीन दर्जाचा

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या आणि एनआरसीच्या विरोधात गेल्या ५० हून अधिक दिवसांपासून दिल्लीतल्या शाहिन बागेत आंदोलन सुरू आहे. या भागातील आंदोलनाचा मुद्दा दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी आला आहे. त्या पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी केलेला आरोप गंभीर आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी, ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. 

असदुद्दिन ओवेसी यांनी म्हटले आहे की, ८ फेब्रुवारीनंतर शाहिन बागेतील आंदोलकांवर सरकारकडून कारवाई केली जाऊ शकते. तिथे गोळ्याही झाडल्या जाऊ शकतात. शाहिन बागेचे रुपांतर जालियनवाला बागेत केले जाऊ शकते. भाजपच्या एका नेत्याने म्हटलेही आहे की गोळ्या झाडा. कोण वादग्रस्त विधाने करत आहे याचा शोधही सरकारनेच घेतला पाहिजे.

डोनाल्ड ट्रम्प यांना दिलासा, सिनेटने महाभियोग फेटाळला

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर सरकार शाहिन बागेतील आंदोलकांवर कारवाई करेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या ५० दिवसांहून अधिक काळ या भागात आंदोलन सुरू आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीची कोंडी होते आहे. या परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ओवेसी यांनी हे आरोप केले आहेत.