पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लंडनमध्ये लेस्बियन जोडीला तरुणांची मारहाण, अश्लील चाळे करण्याची मागणी

तरुणांच्या टोळक्याने तरुणींना मारहाण केली

लंडनमधील रात्र बससेवेतून निघालेल्या दोन लेस्बियन (समलिंगी संबंध) तरुणींना तरुणांच्या टोळक्याने ३० मेच्या रात्री त्रास देत मारहाण केली. याप्रकरणी लंडन पोलिसांनी शुक्रवारी चार तरुणांना अटक केली. या तरुणांनी संबंधित तरुणींना त्यांच्यासमोर एकमेकींचे चुंबन घेण्याची मागणी केली. त्याला या तरुणींनी नकार दिल्यावर त्यांना मारहाण करण्यात आली. 

मेलानिया गेमोनाट आणि ख्रिस यांनी याप्रकरणी लंडन पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मेलानिया हिने दिलेल्या माहितीनुसार, ते जेव्हा बसमध्ये आले. त्यावेळी बसमध्ये आम्ही दोघीच होतो. त्यांनी आल्यावर लगेचच विचित्र चाळे करण्यास सुरुवात केली. आम्ही दोघींनी एकमेकींचे चुंबन घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर आम्हाला लेस्बियन म्हणून हिणवण्यास सुरुवात केली आणि विचित्र हावभाव केले. मेलानियाने आपल्या फेसबुक वॉलवर याबद्दल माहिती दिली आहे. 

ते सतत आम्हाला चिडवत होते. आमच्या दिशेने नाणी फेकत होते. त्यांनी ख्रिसला मारहाण केल्यामुळे ती रक्तबंबाळ झाली होती. त्यानंतर त्यांनी मलाही बुक्क्यांनी मारहाण केली, असे मेलानिया लिहिले आहे. दोघींना मार लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ३० मेच्या रात्री अडीच वाजता हा प्रकार घडला. या दोघीही उत्तर लंडनमधून बसमध्ये चढल्या होत्या. अटक करण्यात आलेले सर्वजण १५ ते १८ या वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.