पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पोहे खाण्याच्या पद्धतीवरुन बांगलादेशी ओळखायचे, भाजप नेत्याचा अजब तर्क

कैलास विजयवर्गीय

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) विरोधात आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकांच्या कपड्याबात पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजप नेते कैलाश विजयवर्गीय यांनीही वादग्रस्त विधान केले आहे. मजुरांच्या पोहे खाण्याच्या पद्धतीवरुन बांगलादेशी ओळखू येतात, असे विजयवर्गीय यांनी म्हटले आहे.

'...कारण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही'

इंदूर प्रेस क्लबमध्ये 'लोकशाही-संविधान-नागरिकता' या विषयावरील एका परिसंवादात विजयवर्गीय सहभागी झाले होते. ते म्हणाले, नुकताच माझ्या घरी एका खोलीचे काम सुरु होते. त्यावेळी मला तेथील मजुरांची खाण्याची पद्धत जरा विचित्र वाटली. ते केवळ पोहे खात होते. मी त्यांना आणि त्यांच्या ठेकेदारांना हे बांगलादेशी आहेत का, असा सवालही केला. त्यानंतर ते मजूर पुन्हा कामावर आले नाहीत.

'हिंदू-मुस्लिम दंगल घडविण्याचा संघाचा प्रयत्न' 

विजयवर्गीय पुढे म्हणाले की, मी सध्या तरी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केलेली नाही. मी केवळ लोकांना जागरुक करण्यासाठी हे उदाहरण दिले आहे. अफवांमुळे स्वतःची दिशाभूल करुन घेऊ नका. सीएए देश हितासाठी आहे. हा कायदा खऱ्या शरणार्थींना नागरिकता देईन आणि यामुळे घुसखोरांची ओळख पटले. हे घुसखोर देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी धोकादायक आहेत. 

नालासोपारा : बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण देणारा अटकेत

यापूर्वी झारखंड येथील दुमका येथे आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी तिखट शब्दांत टीका केली होती. काँग्रेस आणि त्यांचे सहकारी वादंग निर्माण करत आहेत. त्यांचे काही चालले नाही की ते जाळपोळ करतात. हे जाळपोळ करणारे कोण आहेत, हे त्यांच्या कपड्यावरुन समजते, असे त्यांनी म्हटले होते.

तिसरीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या