पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गांधी कुटुंबियांची SPG सुरक्षा काढण्यावरून काँग्रेस आक्रमक

सोनिया आणि राहुल गांधी (संग्रहित छायाचित्र)

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे विशेष संरक्षण गटाचे (एसपीजी) संरक्षण काढून टाकण्याच्या निर्णयावरून मंगळवारी संसदेमध्ये काँग्रेसने सरकारला धारेवर धरले. गांधी कुटुंबियांच्या जीविताला आजही धोका आहे. त्यामुळे त्यांचे एसपीजी संरक्षण कोणत्याही स्थितीत मागे घेतले जाऊ नये, अशी मागणी लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी यांनी केली.

आपापसातील भांडणात दोघांचेही नुकसान, भागवतांचे सूचक वक्तव्य

गेल्या आठवड्यात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना देण्यात आलेल्या एसपीजी संरक्षणाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये गांधी कुटुंबियांच्या जीविताला विशेष धोका नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. त्यानंतर गांधी कुटुंबियांना देण्यात आलेले एसपीजी संरक्षण मागे घेण्यात आले. गांधी कुटुंबियांना एनएसजी किंवा सीआरपीएफकडून संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यालाच काँग्रेसच्या सदस्यांनी तीव्र विरोध केला.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी या सामान्य महत्त्वाच्या व्यक्ती नाहीत. गांधी कुटुंबियांना एसपीजी संरक्षण देण्याचा निर्णय माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारनेच घेतला होता. एनडीए दोनवेळा सत्तेत असतानाही गांधी कुटुंबियांचे एसपीजी संरक्षण काढण्यात आले नव्हते, याकडे अधीररंजन चौधरी यांनी लक्ष वेधले.

मध्यमवर्गीयांना लवकरच सरकारकडून 'गिफ्ट', कोट्यवधी लोकांचा फायदा

अधीररंजन चौधरी यांनी या प्रकरणात कोणतीही नोटीस दिलेली नसल्यामुळे ते शून्य प्रहरात हा विषय उपस्थित करू शकत नाहीत, असे संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सांगितले. काँग्रेसच्या सदस्यांनी यावेळी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. सूडाचे राजकारण थांबवा, आम्हाला न्याय द्या, हुकूमशाही थांबवा, अशा आशयाच्या घोषणा देण्यात येत होत्या.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना देण्यात आलेली एसपीजी सुरक्षाही काढून घेण्यात आली आहे. त्यांना आता झेड प्लस श्रेणीतील सुरक्षा देण्यात आली आहे. मनमोहन सिंग यांच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत.