पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हेमंत सोरेन यांच्या शपथविधी सोहळ्याला 'हे' दिग्गज नेते राहणार उपस्थित

हेमंत सोरेन

झारखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हेमंत सोरेन २९ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. रांची येथे हा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधी सोहळ्यामध्ये १४ पक्ष सहभागी होणार आहेत. माजी राष्ट्रपती प्रणव मुख्यर्जी, राहुल गांधी यांच्यासह ३० नेते या शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जेएमएमचे प्रवक्ते सुप्रीयो भट्टाचार्य यांनी ही माहिती दिली आहे.

घाटकोपर: खैरानी रोडवर लाकडाच्या कारखान्याला भीषण आग

हेमंत सोरेन दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. याआधी हेमंत सोरेन यांनी जुलै २०१३ मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. जेएमएम-काँग्रेस-आरजेडीसोबत त्यांनी एक वर्ष पाच महिने १५ दिवस सरकार चालवले. दरम्यान, हेमंत सोरेन आता दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी- वाड्रा, बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार आहेत.

'सत्ता आणि खुर्चीने शिवसेनेच्या तोंडाला टाळे लावले'

याचसोबत या शपथविधी सोहळ्याला तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, डीएमके चीफ एमके स्टॅलिन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, आरजेडी नेता तेजस्वी यादव सहभागी होणार आहेत. 

२५ दिवसांतच दोन मंत्र्यांच्या बंगल्यात बदल

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:these veteran leaders will attending oath ceremony of jharkhand cm designate hemant soren