पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काहीतरी गडबड आहे, शाहिन बाग प्रकरणात सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

शाहिन बाग आंदोलन

दिल्लीतील शाहिन बागेत गेल्या अनेक दिवसांपासून सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकाना तेथून हटविण्यात यावे, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी सविस्तर सुनावणी घेण्यात येणार आहे. काहीतरी गडबड आहे, असेही निरीक्षण न्यायालयाने या आंदोलनाबद्दल आणि त्यांच्या ठिकाणाबद्दल मांडले.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ७०० कोटींचे अतिरिक्त वाटप, हायकोर्टात माहिती

या प्रकरणात अमित साहनी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. 

न्या. संजय कौल आणि न्या. के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने येत्या सोमवारी, १० फेब्रुवारीला सविस्तर सुनावणी घेण्याचे निश्चित केले. दिल्लीमध्ये उद्या, शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होते आहे. हा मुद्दा याचिकाकर्त्यांनी न्यायालयात मांडला. त्यावर न्यायालयाने म्हटले की, त्यामुळेच आम्ही सोमवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केले. तिथे काहीतरी गडबड निश्चित आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

हिंदू महासभा नेत्याच्या हत्येप्रकरणी पत्नीसह तिघांना अटक

आंदोलनामुळे शाहिन बाग परिसरातील रस्ते गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे विनाकारण सामान्य लोकांना त्रास होतो आहे. अनेक दिल्लीकरांचा मौल्यवान वेळ वाया जातो आहे, याकडे याचिकाकर्त्यांनी लक्ष वेधले. गेल्या ५० हून अधिक दिवसांपासून या ठिकाणी सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.