पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात २०४७ पर्यंत भाजपच सत्तेत राहिल - राम माधव

राम माधव

आपण स्वातंत्र्यांच्या १०० व्या वर्षात पदार्पण करेपर्यंत म्हणजेच २०४७ पर्यंत देशात भाजपच सत्तेत राहिल, असे भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी शुक्रवारी त्रिपुरामध्ये म्हटले आहे. एएनआयने या संदर्भातील ट्विट केले आहे.

देशात सर्वाधिक काळ सलग कोणता पक्ष सत्तेवर राहिला असेल, तर तो काँग्रेस आहे. काँग्रेस १९५० ते १९७७ या काळात केंद्रात सत्तेवर होता. पण काँग्रेसचे हे रेकॉर्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी तोडतील, अशी मी तुम्हाला ग्वाही देतो, असेही राम माधव यांनी म्हटले आहे. 

इम्रान खान यांचे नरेंद्र मोदींना पत्र, शांततेसाठी मिळून कामाचे आवाहन

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा स्पष्ट बहुमतासह सत्तेवर आला आहे. ३० मे रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. लोकसभेतील ५४३ जागांपैकी ३०३ जागांवर भाजप यशस्वी ठरला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांसह भाजपने लोकसभेत ३५० पेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. विशेष म्हणजे २०१४ मधील लोकसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत भाजपच्या जागा वाढल्या आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला २८२ जागा मिळाल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर राम माधव यांनी वरील वक्तव्य केले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:There will be BJP in power till the time we enter 100th year of independence in 2047 says ram madhav