पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानात ४० दहशतवादी गट कार्यरत होते, इम्रान खान यांची कबुली

इम्रान खान

पाकिस्तानमध्ये ४० दहशतवादी गट कार्यरत होते अशी कबुली त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी अमेरिकेत दिली. अमेरिकी काँग्रेसच्या सदस्यांशी संवाद साधताना इम्रान खान यांनी ही कबुली दिली. त्यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानच दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान असल्याच्या भारताच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

कर्नाटक सरकार पडल्यानंतर प्रियांका गांधींचे भाजपला सणसणीत प्रत्युत्तर

इम्रान खान म्हणाले की, ९/११ ला अमेरिकेत जे घडले, त्याचा पाकिस्तानशी काहीही संबंध नव्हता. अल कायदा ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानमध्ये कार्यरत होती. पाकिस्तानमध्ये तालिबानी दहशतवादी नव्हते. तरीही आम्ही दहशतवादाविरुद्धच्या अमेरिकेच्या लढाईत सहभागी झालो होतो. पण दुर्दैवाने पुढे गोष्टी बदलल्या. आम्ही अमेरिकेला आमच्या भूमीवर काय चाललंय याची खरी माहिती दिली नाही. त्याबद्दल मी आमच्या देशातील आधीच्या सरकारांनाच दोष देईन. 

आमच्या देशातील आधीच्या सरकारांचे यंत्रणांवर पूर्ण नियंत्रण नव्हते. देशात वेगवेगळे ४० दहशतवादी गट कार्यरत आहेत. माझ्यासारख्या अनेक पाकिस्तानी नागरिकांनी एकवेळ अशी चिंता होती की या सगळ्यातून आपण कसे बाहेर पडणार. ज्यावेळी आम्ही अमेरिकेला दहशतवादाविरुद्धच्या लढाईत मदत करावी, अशी अपेक्षा केली जात होती. त्यावेळी दुसऱ्या बाजूला आम्ही आमच्या अस्तित्त्वाची लढाई लढत होतो, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.

पहिले राफेल विमान सप्टेंबरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यात

इम्रान खान तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. सोमवारीच त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली.