पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

NPR प्रक्रियेचा NRC शी काहीही संबंध नाही : अमित शहा

अमित शहा

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. दोन्ही मुद्दे एकत्रित करु नयेत, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांना केले आहे. सध्याच्या घडीला चर्चेत असेलल्या एनपीआर (राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) या मुद्यावर संभ्रम निर्माण होऊ नये, या हेतूने त्यांनी एका मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी देशवासियांना दोन्ही प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. एनपीआर हा युपीए सरकारने तयार केलेला कायदा आहे. तोच आम्ही पुढे घेऊन जात आहोत. काँग्रेसने आणलेला हा कायदा माहिती संचलानासाठी उत्तम असल्याचा उल्लेखही अमित शहा यांनी यावेळी केला.

'NPRसाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही, जनतेवर आमचा पूर्ण विश्वास'

एनपीआरमध्ये नागरिकांना काही माहिती देणे बंधनकारक असणार आहे. माहिती संकलनासाठी एनपीआर प्रक्रिया महत्त्वपूर्ण असून एनपीआरसाठी आधार कार्ड देणे गैर नाही, असेही अमित शहा यांनी म्हटले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यानंतर देशभरात झालेल्या आंदोलनाविषयी देखील त्यांनी भाष्य केले. ज्याठिकाणच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले त्याठिकाणी संवाद साधण्यात आम्ही कमी पडलो, अशी कबुलीही त्यांनी दिली.

नो NRC- नो CAA कोणीही बंगाल सोडणार नाही; ममतांचा नवा नारा

एनपीआरमुळे देशातील नागरिकत्व जाण्याची कोणतीही तरतूद नाही. याशिवाय सुधारित नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातूनही नागरिकत्व जाणार नाही, हे जनतेने लक्षात घ्यावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे ते म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करु नका, असे आवाहन देखील त्यांनी केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी सुधारित नागरिकत्व कायदा राज्यात लागू करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. यावरही अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली. ज्या राज्यातून सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध होत आहे, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, असे ते म्हणाले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:There is no link between National Register of Citizens and National Population Register says Home Minister Amit Shah