पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा ८७३ वर, तर १९ जणांचा मृत्यू

कोरोना विषाणू

भारतामध्ये कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सरकारकडून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. अशातच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ८७३ वर पोहचला आहे. तर या विषाणूने १९ नागरिकांचा बळी घेतला आहे. त्याचसोबत देशातील ६७ कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना : कनिका कपूरच्या प्रकृतीत सुधारणा, पण...

भारतामध्ये कोरोना दुसऱ्या- तिसऱ्या टप्प्यात पोहचला आहे. त्यामुळे हळूहळू कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ होत चालली आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. या लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु आहेत. मात्र बस, रेल्वे, लोकल, मेट्रो, विमान सेवा बंद आहे. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी घरातच थांबावे, गर्दी आणि प्रवास टाळावा असे आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येत आहे. 

पुण्यातील शास्त्रज्ञांनी टिपली जीवघेण्या कोरोनाची प्रतिमा

चीनच्या वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात कहर केला आहे. या विषाणूमुळे जगभरातील  नागरिकांना घरामध्येच बसण्याची वेळ आली आहे. जगभरातील ५ लाखांपेक्षा अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे तर आतापर्यंत २५ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका, इटली, स्पेन, फ्रान्स, चीन या देशामध्ये कोरोनाने सर्वात जास्त कहर केला आहे. 

COVID 19 : इटलीत २४ तासांत विक्रमी मृत्यूतांडव!