पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केंद्र सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 'गोड' बातमी

ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी गूड न्यूज

केंद्र सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ६० लाख मॅट्रिक टन निर्यातीवर अनुदान देण्यात येणार असून साखर निर्यातीचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

जावडेकर म्हणाले की, याचा देशातील अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. केंद्र सरकारने ६० लाख मॅट्रिक टन साखर निर्यातीवर ६ हजार २६८ कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले आहे.  हे पैसे थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. या निर्णयामुळे ऊसाचे दर प्रमाणबद्ध राहतील आणि त्यांचे नुकसान होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याशिवाय केंद्र सरकारने नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यासंदर्भातही महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. २०२१ ते २०२२ पर्यंत देशात ७५ नवी वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येतील. तसेच १५ हजार ७०० डॉक्टरांची मेगा भरती करण्यासंदर्भात बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:The Union Cabinet has approved Sugar export policy for evacuation of surplus stocks during sugar season 2019 20